घटस्फोट घेऊन दोन महिने झालेले असतात. सोडलेल्या बायकोनं त्याला फोन केला. तो म्हणाला, “आता का फोन केला?” ती म्हणाली, “मी कार घेतलीय आजच.” तो म्हणाला, “आणखी चार घे, मला काय करायचंय?” ती शांतपणे म्हणाली, “रस्ता क्रॉस करताना काळजी घे.”

मन्या : बाबा! उद्या आपण मालामाल होणार. बाबा : ते कसं काय? मन्या : उद्या आमची गणिताची शिक्षिका पैसे रुपयांमध्ये बदलायला शिकवणार आहे.

बंड्या आणि त्याच्या बायकोचं भांडण होतं… बंड्या (बायकोला) : जर तू कॅलेंडर असतीस, तर दरवर्षी बदललं असतं. बायको : जर तू आलं असतास, तर मनसोक्त कुटलं असतं.

इंग्रजीचं पुस्तक वाचता-वाचता मन्याची बायको त्याला विचारते, “complete आणि finish मध्ये काय फरक आहे?” बंड्या : जसं की, मी तुला भेटल्याने तुझं लाइफ झालं complete आणि… तू मला भेटल्याने माझं लाइफ झालं finish

बंड्या आणि त्याची बायको कडाक्याचं भांडतात. बायको : मी माहेरी जात आहे. बंड्या : मी मंदिरात जातो. बायको : कोणताही आणि कितीही नवस बोललात, तरी मी आता परत येणार नाही. बंड्या : नवस पुरा झाला म्हणून जात आहे.

बंड्याने वॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेज टाकला… आज माझी मॅरेज अ‍ॅनिवर्सरी आहे. लगेच मान्यानं रिप्लाय दिला… व्यक्तिगत समस्या ग्रुपवर टाकू नयेत.

मुलाकडचे : मुली! तुला काही विचारायचं असेल, तर लाजू नकोस. मुलगी : जर तुम्ही समोसे खात नसाल, तर मी खाऊ का?

बंड्या : डॉक्टर! खूप अशक्तपणा जाणवत आहे. डॉक्टर : सालासकट फळं खात जा. एका तासानंतर… बंड्या : डॉक्टर! पोट खूप दुखतय डॉक्टर : काय खाल्ल होतं? बंड्या  : नारळ सालासकट !

इस तरह के और  मजेदार जोक्स पढ़ने के लिए नीचे दिए हुए Follow Button पर क्लिक करके Trending Searches के Official WhatsApp Channel को तुरंत Follow करें धन्यवाद

White Line

      Follow Our Whatsapp Channel