Thu. Jul 25th, 2024
JEE Main 2024 :परीक्षा फॉर्म कसा भरायचा ?नवीन विद्यार्थ्यांसाठी

JEE Main 2024 Registration : इयत्ता 12वी पूर्ण केल्यानंतर आयआयटीसारख्या सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, JEE परीक्षेला बसणे अनिवार्य आहे (जेईई परीक्षा 2024). जेईई परीक्षेचे दोन टप्पे असतात. जेईई मेन परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई ऍडवान्सड परीक्षा (JEE Advanced 2024) बसण्याची संधी मिळते.

जेईई परीक्षेत भाग घेणारे अनेक विध्यार्थी इंटरनेटवर जेईई परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा याविषयी माहिती शोधत असतात . फॉर्म भरताना तुम्हालाही काही अडचणी येत असल्यास, हा लेख तुम्हाला मदत करू शकतो. वेबसाइट डाउनटाइम किंवा क्रॅश बद्दल काळजी करण्याची गरज नाही. JEE Main 2024 Registration फॉर्म 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरता येईल.

JEE Main 2024 :  JEE Main 2024  फक्त 3 स्टेप्स मध्ये भरा फॉर्म .

जेईई मेन 2024 नोंदणी फॉर्म फक्त 3 चरणांमध्ये भरला जाऊ शकतो. JEE main 2024 परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी, अधिकृत वेबसाइट jeemain.ntaonline.in ला भेट द्या.

1. वेबसाइट उघडल्यानंतर ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज करा.
2. ऑनलाइन अर्ज भरा.
3. कागदपत्रे सबमिट करा.

नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी काय करावे?

ज्या विद्यार्थ्यांनी आधी JEE वेबसाइटवर Registration केल आहे ते या वेळी त्यांचे जुने लॉगिन क्रेडेन्शियल वापरून अर्ज करू शकतात. त्यांना Login by मध्ये DigiLocker ID किंवा अर्ज क्रमांक निवडावा लागेल. त्यानंतर, त्यांनी पासवर्ड आणि सुरक्षा पिन प्रविष्ट केला पाहिजे. उमेदवार त्यांचा पासवर्ड विसरल्यास, ते त्याच पानावर दिलेल्या लिंकचा वापर करून तो पुन्हा तयार करू शकतात.

नवीन विद्यार्थ्यांनी काय करावे?

12वी बोर्ड परीक्षा किंवा मागील वर्षीय बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या वर्षी पहिल्यांदा JEE Main परीक्षेला बसलेले उमेदवार New Candidate Register Here यांवर करू शकतात. यासाठी वेबसाईटवर “New Candidate Register Here” ही लिंक आहे. JEE Main 2024 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी त्यांनी त्या लिंकवर क्लिक करावे.

you may like this : Solution for Increasing Height : मुलांची उंची वाढत नसेल तर हे करा, मग पहा परिणाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *