Mon. Jul 22nd, 2024
Ganesh Chaturthi 2023 आरती संग्रह मराठी

Ganesh Chaturthi 2023 : आरती संग्रह मराठी

1. सुखकर्ता दुखहर्ता 

 

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥

 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ।

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।

हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥

 

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥

 

2. गजानना श्रीगणराया ।

गजानना श्रीगणराया ।

आधी वंदू तुज मोरया ॥

मंगलमूर्ती श्री गणराया ।

आधी वंदू तुज मोरया ॥०१॥

 

सिंदुर-चर्चित धवळे अंग ।

चंदन उटी खुलवी रंग ।

बघतां मानस होतें दंग ।

जीव जडला चरणी तुझिया ।

आधी वंदू तुज मोरया ॥०२॥

गजानना श्रीगणराया ।

आधी वंदू तुज मोरया ॥

 

गौरीतनया भालचंद्रा ।

देवा कृपेच्या तूं समुद्रा ।

वरदविनायक करुणागारा ।

अवघी विघ्नें नेसी विलया ।

आधी वंदू तुज मोरया ॥०३॥

गजानना श्रीगणराया ।

आधी वंदू तुज मोरया ॥

3. घालीन लोटांगण वंदिन चरन ।

घालीन लोटांगण वंदिन चरन ।

डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।

प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।

भावे ओवालीन म्हणे नामा ।

 

त्वमेव माता पिता त्वमेव ।

त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।

त्वमेव सर्वम मम देव देव ।

 

कयें वच मनसेन्द्रियैवा ।

बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।

करोमि यद्यत सकलं परस्मै ।

नारायणायेति समर्पयामि ॥०१॥

 

अच्युत केशवम रामनरायणं ।

कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।

श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।

जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥


हरे राम हरे राम ।

राम राम हरे हरे ।

हरे कृष्णा हरे कृष्णा ।

कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥

 

4. शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को ।

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को ।

दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को ।

हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को ।

महिमा कहे न जाय लागत हूं पद को ।

जय देव जय देव ॥०१॥

 

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।

धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।

जय देव जय देव ॥०२॥

 

भावभगत से कोई शरणागत आवे ।

संतति संपत्ति सबहि भरपूर पावे ।

ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।

गोसावीनन्दन निशिदिन गुण गावे ।

जय देव जय देव ॥०३॥

 

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।

धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।

जय देव जय देव ॥०४॥

 

5. दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

 

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥

वारी वारीं जन्ममरणाते वारी ।

हारी पडलो आता संकट नीवारी ॥०१॥

 

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥

 

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥

साही विवाद करितां पडिले प्रवाही ।

ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥०२॥

 

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥

 

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।

क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।

नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥०३॥

 

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥

6. शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥०१॥

 

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

 

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।

अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥०२॥

 

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

 

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।

त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥

तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥०३॥

 

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

 

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥०४॥

 

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

 

7. आरती ज्ञानराजा

 

आरती ज्ञानराजा

महाकैवल्यतेजा, कैवल्यतेजा

सेविती साधुसंत

मनु वेधला माझा

वेधला माझा

आरती ज्ञानराजा ॥०१॥

 

लोपलें ज्ञान जगीं

हित नेणती कोणी, नेणती कोणी

अवतार पांडुरंग

नाम ठेविले ज्ञानी, ठेविले ज्ञानी ॥०२॥

 

आरती ज्ञानराजा

महाकैवल्यतेजा

सेविती साधुसंत

मनु वेधला माझा, वेधला माझा

आरती ज्ञानराजा ॥०३॥

 

कनकाचे ताट करीं

उभ्या गोपिका नारी

गोपिका नारी, नारद तुंबरही

साम गायन करी, गायन करी

आरती ज्ञानराजा ॥०४॥

 

प्रगट गृह्य बोले

विश्व ब्रह्मचि केलें

ब्रह्मचि केलें

रामाजनार्दनीं

चरणीं मस्तक ठेविलें

आरती ज्ञानराजा ॥०५॥

 

आरती ज्ञानराजा

महाकैवल्यतेजा

सेविती साधुसंत

मनु वेधला माझा, वेधला माझा

आरती ज्ञानराजा ॥०६॥

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *